आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समृद्ध जीवन’ कंपनीची देशातील कार्यालये सील; ग्राहकांना कोट्यवधी रुपयांना गंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- गुंतवणुकीचे अामिष दाखवून ग्राहकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज काे-अाॅपरेटिव्ह साेसायटी लिमिटेडच्या देशभरातील सर्व कार्यालयांना सीबीअायने साेमवारी  सील ठोकले. समृद्ध जीवन कंपनीचा मुख्य संचालक महेश माेतेवार सध्या तुरुंगात अाहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, िदल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, पंजाब, गाेवा, राजस्थान, अांध्र प्रदेश, हरियाणा, झारखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांत समृद्ध जीवन कंपनीची कार्यालये अाहेत. चिट फंड घाेटाळ्यात कंपनीविराेधात गुन्हा दाखल असून कंपनीचे कार्यालये, संचालक यांच्या निवासस्थानी यापूर्वी सीबीअायने छापे टाकून महत्त्वपूर्ण कागदपत्रे, हार्डडिस्क, बँकेच्या अार्थिक व्यवहाराचे पुरावे जप्त करण्यात आले अाहेत. चिट फंडच्या माध्यमातून बेकायदा पैसे गाेळा केल्याप्रकरणी समृद्ध जीवनविराेधात असंख्य तक्रारी अाहेत.
बातम्या आणखी आहेत...