आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनातनच्या तावडेला सात दिवसांची कोठडी, तीन हत्यांची होणार चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डाॅ.नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीअायने पनवेलमधून अटक केलेला सनातनचा साधक व हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता डॉ. वीरेंद्र तावडेला १६ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. डॉ. दाभोलकरांच्या हत्येपुरताच तपास मर्यादित नसून कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कर्नाटकातील डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येवेळीही एकाच प्रकारच्या वाहनाचा व शस्त्राचा वापर झाल्याने त्याबाबतही तावडेकडे चौकशी करायची असल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितल्यानंतर तावडेची रवानगी सीबीआय कोठडीत करण्यात आली.

न्यायमूर्ती एम.एन.शेख यांनी डाॅ.तावडेला १६ जूनपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे अादेश दिले अाहे. न्यायालयाने तावडेला सीबीआयबाबत काही तक्रार अाहे का, असे विचारले असता त्याने अटक झाल्यानंतर सीबीअायच्या एका अधिकाऱ्याने अापल्या दाेन्ही कानाखाली थप्पड मारल्याचे सांगितले.

सीबीअायचे वकील बी. पी. राजू न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, डाॅ.दाभाेलकर यांच्या हत्येवेळी काळया रंगाच्या पल्सर वाहनाचा वापर झाला आहे. तावडेकडे सार्धम्य असलेले वाहन असून त्याबाबत तपास करावयाचा अाहे. २००९च्या गोव्यातील मडगाव बाॅम्बस्फाेट प्रकरणातील हिंदू जनजागरण समितीच्या एका अाराेपीसाेबत इ-मेलच्या माध्यमातून डाॅ.तावडेचे २००८ मध्ये 2008 मध्ये संभाषण झाल्याचे पुरावे मिळालेले अाहेत. याप्रकरणात एका साक्षीदाराचा सीबीअायने सीअारपीसी १६४ नुसार जबाब नाेंदवलेला अाहे. सदर गाेपनीय जबाब न्यायालयात सीबीअायने यावेळी सादर केला. डाॅ.तावडे हा कान,नाक, घसा तज्ञ असून २००१ पासून त्याने डाॅक्टरकी साेडून पूर्णवेळ सनातन संस्थेचे काम करत अाहे.
हत्या तपासाच्या पाठपुराव्याचे फलित
सीबीअायने ज्याप्रकारे तपासास सुरुवात केली अाहे, त्यावर अाम्ही समाधानी अाहे. सदर तपासाच्या पाठपुराव्याकरिता वेळाेवेळी अाम्ही अांदाेलन, निर्देशने केली. या घटनेचा तपास अंतिम स्तरापर्यंत जावा, अशी प्रतिक्रिया अंनिसचे राज्य सरचिटणीस डाॅ.हमीद दाभाेलकर यांनी या अटकेवर दिली. दरम्यान, डाॅ.नरेंद्र दाभाेलकर यांची हत्या झाली त्या महर्षी वि.रा.शिंदे पुलावर शनिवारी सकाळी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी घाेषणाबाजी केली.
बातम्या आणखी आहेत...