आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळू माफियांनी उडवला बंधारा, बारामती तालुक्यातील लाखाे लिटर पाणी वाया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - राज्यभरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना काही माफियांनी विनासायास वाळू उपसा करता यावा यासाठी चक्क तुडुंब भरलेल्या बंधाऱ्याच्या दाेन-तीन मोऱ्या स्फाेटाने उडवून दिल्या. ही घटना साेमवारी रात्री कांबळेश्वर (ता. बारामती) गावाजवळ घडली. यामुळे पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून जाणाऱ्या नीरा नदीवरील बंधाऱ्यातील लाखाे लिटर पाणी वाहून गेले. दरम्यान, स्फाेटाच्या अावाजाने जागे झालेल्या काही शेतकऱ्यांनी बंधाऱ्याला झडपा बसवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश अाले नाही. या प्रकारामुळे फलटण व बारामती तालुक्यातील सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊसपीक धोक्यात आले अाहे.

नीरा नदीवरील वाळू ठेकेदारांना पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन परिसरातील एका गुंडाचा वरदहस्त अाहे. कांबळेश्वर गावात बंधारा उडवण्यामागे हाच कुख्यात गुंड असल्याची चर्चा दबक्या अावाजात सुरू झाली अाहे. दाैंड तालुक्यात वाळू माफियाने उच्छाद मांडलेला असताना अाता हे लाेण बारामती व फलटण तालुक्यातही पोहोचले अाहे. गेल्या आठवड्यात कांबळेश्वर येथील याच बंधाऱ्यावरील २४ ढापे चोरीला गेले. याबाबत पाेलिसात तक्रारही दाखल झाली अाहे. मात्र अाराेपी सापडलेले नाहीत. त्यातच रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात अाराेपींनी जिलेटीनचा स्फाेट घडवून या बंधाऱ्याच्या दाेन माेऱ्या उडवून दिल्या. त्यामुळे लाखाे लिटर पाणी वाहून गेले. स्फाेटाचा अावाज एेकून परिसरातील ग्रामस्थ त्या ठिकाणी जमा झाले हाेते, मात्र ताेपर्यंत अाराेपी फरार झाले. साेमवारी सायंकाळपर्यंत फलटण पाेलिसांकडून बंधाऱ्याच्या पंचनाम्याचे काम सुरू हाेते.

मुदत संपणार असल्याने स्फोट
नीरा नदीवरील पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील वाळू उपशाच्या परवान्याची मुदत १० जून राेजी संपत अाहे. त्यामुळे नियम डावलून जास्तीत जास्त वाळू उपशाचे प्रयत्न हाेत असतात. कांबळेश्वर येथील बंधारा तुडुंब भरल्यामुळे यांत्रिक बोटीच्या मदतीने वाळू उपसा करण्यात अडचणी येत हाेत्या. त्यामुळेच हा बंधारा स्फाेटाच्या साह्याने उडवून देण्यात अाला असावा, असा संशय परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त हाेत अाहे.
माफियांना धडा शिकवा
^शासनाने वाळू माफियांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ते हे धाडस करू शकतात. माफियांनी स्वार्थासाठी बंधारा उडवून कोट्यवधींचे नुकसान केले जाते. शासनाने वेळीच माफियांना धडा शिकवावा; अन्यथा आक्रमक आंदोलन छेडले जाईल.
भैय्यासाहेब शिंदे, ग्रामस्थ, कांबळेश्वर
बातम्या आणखी आहेत...