आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-सोलापूर महामार्गावर वाळूच्या ट्रकला टँकरची धडक; 2 ठार, 6 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनजवळ आज (शनिवारी) पहाटे चार वाजता रस्त्यावर थांबलेल्या वाळूच्या ट्रकला पाठीमागून टॅकर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

या अपघातात अंकुश राजाभाऊ पंडीत (वय-14, रा.दहामोनी ता.सोनपेठ, जि. परभणी) व टँकरचालक एकनाथ विश्वनाथ बाचारे (वय-37, रा. दहामोनी) यांचा जागेवरच मृत्यू झाला. टॅकरमधील प्रवासी मेघराज नाथाराव हनवटे (वय-36, रा.  चांदापूर ता. परळी, जि.बीड), राजू विश्वनाथ पंडीत (वय-35, रा.दहामोनी), कांताबाई मरीबा उजगर (वय-45, रा.मांडवा परभणी), इंदु राजु पंडीत (वय 33, दहामोनी), व ट्रकचालक शैहफान दशरथ शेख (वय-23, इंदापूर) जखमी झाले आहेत.  शैहफान गंभीर जखमी असून, शैहफानसह सर्व जखमींना उपचारासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने शैहफान व त्यांचा भाऊ महेश हा रस्त्यावर उतरून पाहाणी करत असताना, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने ट्रकला धडक दिली. प्रसंगावधान राखल्याने महेश थोडक्यात बचावला.
बातम्या आणखी आहेत...