आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या प्रमाणात रक्त चंदनाचा साठा जप्त,वन विभागाने केली धडक कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - पुणे-सोलापूर राष्‍ट्रीय महामार्गावरील उजनी धरण क्षेत्रात एका उसाच्या शेतात वन विभागाने धडक कारवाई करत गुरुवारी मोठ्या प्रमाणात रक्त चंदनाचा साठा जप्त केला. मात्र, वन विभागाने पहिल्यांदा चार टन नंतर अडीच टन आणि शेवटी दीड टन साठा सापडल्याचे सांगितल्याने वन विभागाच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.


महामार्गावर बाळू लोढें यांची शेती आहे. बुधवारी सायंकाळी लोंढे यांच्या पत्नी शेतातून घरी परतत असताना त्यांना उसाचे नुकसान झाल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता त्यांना शेतात मोठ्या प्रमाणात रक्तचंदन आढळून आले. यानंतर लोंढे यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. घटनास्थळी आलेल्या वनाधिका-यांनी चंदन जप्त केले. मात्र, जप्त करण्यात आलेल्या चंदनाचा नेमका आकडा सांगण्यात वन विभागाकडून वेगवेगळी उत्तरे देण्यात आली. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.