आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sandip Karnik Will Come Out Clean In Maval Firing Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मावळ प्रकरणात कर्णिक निर्दोष सुटतील - भोसले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पवना बंद जलवाहिनी विरोधात पुकारण्यात आलेल्या मावळ बंद दरम्यान पोलिसांनी केलेला गोळीबार हा समर्थनीय होता. पोलिसांच्या जीवाला धोका असल्याने त्यांनी गोळीबार केला. पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप कर्णिक या प्रकरणातून निर्दोष मुक्त होतील, असा अशावाद कर्णिक यांचे वकील सुरेशचंद्र भोसले यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
मावळ आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेत तीन शेतक-यांचा मृत्यू झाला होता तर काही आंदोलकांना गोळ्या लागल्या होत्या. राज्य शासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक केली होती. या समितीने नुकताच गृहमंत्रालयास सदर अहवाल सादर केला आहे.
भोसले म्हणाले, भाजप, शिवसेना व रिपाइं या पक्षांनी पुकारलेला बंद घटनाबाह्य होता. बेकायदेशीररीत्या दु्रतगती मार्गावर जमाव जमवून रस्ता रोको करण्यात आले होते. जमावास रस्त्यावरून हुसकावून लावणे व वाहतुक सुरळीत करण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला होता.
अधीक्षकांनी पोलिसांना परिस्थितीनुरूप कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलिस अधिकाºयांनी आपल्या अधिकारांचा वापर केला. प्रसारमाध्यमांनी या घटनेतील एकाच बाजूची चित्रफित दाखवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला. मावळ आंदोलन ही दंगल होती त्यात पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अनिवार्यपणे गोळीबार केल्याचे त्यांनी सांगितले.