आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संघ स्वयंसेवकांनी चीनविराेधात थोपटले दंड! खरेदी-विक्रीवर बहिष्कार टाकण्याचे अावाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चीनच्या विरोधात दंड थोपटले आहेत. देशाची अर्थव्यवस्था, संरक्षण आणि सुरक्षेच्या विरोधात सतत कारवाया करणाऱ्या चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत संघाने ‘स्वदेशी अभियान’ चालू केले आहे. 
  
संघ आणि स्वदेशी जागरण मंचातर्फे १० ऑक्टोबरपर्यंत राज्यात स्वदेशी अभियान राबवले जाणार आहे. यानिमित्ताने संघाचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन स्वदेशीला पाठिंबा मिळवण्यासाठी लोकांच्या स्वाक्षऱ्या गोळा करणार आहेत. तसेच, स्वदेशीविषयक माहितीचा प्रसार करणार आहेत.   

रेल्वेस्थानकावरील महात्मा गांधी पुतळा, महात्मा गांधी स्मारक, आगाखान पॅलेस, केसरी वाडा, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक अशा पुण्यातल्या ऐतिहासिक ठिकाणांहून संघातर्फे स्वदेशी अभियानाचा प्रारंभ करण्यात अाला. महापौर मुक्ता टिळक, पुरातत्त्व विभागाचे बी. जी. येळीकर, संघाचे पुणे कार्यवाह महेश करपे आदी या वेळी उपस्थित होते.  

चिनी वस्तूंच्या खरेदीतून पाकिस्तानी अतिरेक्यांना पैसा आणि शस्त्रास्त्रे मिळतात. त्यामुळे ज्याप्रमाणे भारतीय सैनिक सीमेवर चीनला रोखून धरतो, त्याप्रमाणे देशभक्त नागरिकांनी चिनी वस्तू विकत न घेऊन चीनला भारतीय बाजारपेठेत रोखले पाहिजे. भारतीय उद्योग, व्यापार, रोजगार क्षेत्रांना वाचवण्यासाठी चिनी वस्तूंसहित विदेशी मालाच्या खरेदी व विक्रीवर नागरिकांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन संघाने केले आहे.  

पायपुसणी, खेळणी, पणत्या येथपासून ते इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यंत चिनी मालाने भारतीय बाजारपेठेत घुसखोरी केली आहे. त्यामुळे देशी लघु उद्योजक, छोटे कारागीर बेरोजगार होत आहेत. भारतीय उद्योजक- कारागिरांनी बनवलेल्या वस्तू आग्रहाने विकत घेऊन आपल्याच देशबांधवांना आपण मदत करू शकतो. यातून स्वदेशी उद्योगांना बळकटी देऊ शकतो. चिनी मालामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यासाठी संघाने स्वदेशी अभियान हाती घेतले असल्याचे सांगण्यात आले.   

स्वदेशी कशासाठी?  
भारत चीनमधून प्रचंड आयात करतो. तुलनेने भारताची चीनमधील निर्यात खूप कमी आहे. चीनच्या देशविरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी त्यांची आर्थिक कोंडी केली पाहिजे. जागरूक भारतीय नागरिक म्हणून चीनच्या आर्थिक आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याचे आपले कर्तव्य आहे, असे आवाहन पुण्याचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...