आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुण दातेंचे धाकटे पुत्र संगीत यांचे मुंबईत निधन, आढळले होते पुण्‍यातील रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आपल्याभावगीतांनी मराठी माणसांना वेड लावणारे गायक अरुण दाते यांचा विपन्नावस्थेत जगणारा मुलगा संगीत यांचे बुधवारी सकाळी मुंबईतील लोकमान्य टिळक (सायन) रुग्णालयात निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. कुटुंबीयांनी संबंध तोडल्यामुळे संगीत यांच्या मित्रांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

काही महिन्यांपूर्वी संगीत पुण्यातील वाकड पुलाखाली विपन्नावस्थेत सापडले होते. पोलिसांनी त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले हाेते. कुटुंबीयांनी संबंध तोडल्यामुळे आपल्यावर असे जगण्याची वेळ आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर एका संस्थेच्या मदतीने त्यांच्यावर औंध मंगेशकर रुग्णालयातही उपचार करण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. संगीत यांनी मुंबईतील रिझवी काॅलेजातून बीकाॅम, एमबीए केले हाेते. चार वर्षांपूर्वी पत्नीने त्यांच्यापासून घटस्फोट घेतला होता. अार्थिक अडचणीमुळे त्यांनी वांद्रे येथील सदनिका विकली होती. व्यसनामुळे त्यांचा मोठा भाऊ अतुल वडीलांनी संबंध तोडले होते. अशी माहिती त्यांची मैत्रीण जाॅय भोसले यांनी दिली.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात केले होते दाखल
हृदयनाथ मंगेशकर यांना माहिती मिळताच त्‍यांनी तत्काळ संगीतकार सलील कुलकर्णी यांना फोन करून संगीत यांना मदत करण्‍याची सूचना केली होती. त्‍यानंतर सलील यांनी संगीत यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात केले होते.
पोलिसांनीही दाखवली माणुसकी
संगीत दाते यांना हिंजवडी ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल धस आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी सुरुवातीला औंध रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पुण्यातील पुलाखाली सापडले तेव्हा काय म्‍हणाले होते संगीत दाते..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...