आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्त लुटणार दसरा-दिवाळीची मजा, सुटी 14 दिवसांनी वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त यंदा दसरा-दिवाळीची खुप मजा लुटणार आहे. त्याला मिळालेली सुटी संपण्यापूर्वीच त्याची सुटी तब्बल 14 दिवसांनी वाढविण्यात आली आहे.

प्रकृतीचे कारण देऊन 14 दिवसांची सुटी देण्याची विनंती संजय दत्तने कारागृह प्रशासनाकडे केली होती. त्याला प्रशासनाने मान्यता दिल्यावर संजय 14 दिवसांसाठी कारागृहात बाहेर आला. कारागृहात त्याची वागणूक चांगली असल्याने प्रशासनाने त्याला सुटी दिली होती. ही सुटी संपण्यापूर्वीच सुटी वाढवून देण्याचा अर्ज संजयने दाखल केला. प्रकृतीत अजून सुधारणा झाली नसल्याने सुटी वाढवून देण्याची विनंती त्याने केली होती. त्यालाही कारागृह प्रशासनाने मान्यता दिली आहे.

22 मे पासून संजय दत्त येरवडा कारागृहात आहे. बेकायदेशीररीत्या घरी शस्त्रे बाळगल्याने 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यात टाडा न्यायालयाने त्याला दोषी ठरविले होते. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात येणार होती. परंतु, संजयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतरही त्याला दिलासा मिळाला नाही. अखेर त्याला 16 मे रोजी टाडा न्यायालयात शरणागती पत्करावी लागली. त्याला पूर्वी आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर 22 मे रोजी त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात हलविण्यात आले.

संजयला कशी झाली होती शिक्षा, वाचा पुढील स्लाईडवर