आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt Demand For Another Furlough Extension

संजय दत्तने आणखी 14 दिवसाची सुटी मागितली, फर्लोची रजा आज संपणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- गेल्या 14 दिवसापासून येरवडा तुरुंगाबाहेर फर्लोच्या रजेवर असण-या संजय दत्तने आणखी 14 दिवसाची सुटी जेलप्रशासनाकडे मागितली आहे. संजय दत्तला 23 जानेवारी रोजी 14 दिवसाची फर्लो रजा मंजूर झाली होती. ती आज संपत आहे मात्र त्यापूर्वीच संजयने पुन्हा एकदा 14 दिवसाची सुटी आपल्याला जोडून मिळावी म्हणून अर्ज दाखल केला आहे.
संजयच्या या अर्जावर येरवडा प्रशासन विचार करून विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर करेल व त्यानंतर विभागीय आयुक्त याबाबत अंतिम निर्णय घेतील. दरम्यान, संजयला सुटी मिळणार का याकडे लक्ष लागले आहे.
गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी संजय दत्तला मिळणा-या सुटीबाबत शंका व्यक्त करताना चौकशी करण्यात येईल असे म्हटले होते. मात्र, त्यानंतर शिंदेंनी संजयला नियमानुसारच सुटी देण्यात आल्याचे म्हटले होते. संजयच्या सुटीच्या अर्जावर बुधवारी पुण्याचे विभागीय आयुक्त निर्णय घेणार आहेत.