आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt Doing Radio Programme In Yerawada Jail For Prisoners

येरवडा कारागृहामध्ये ‘मुन्नाभाई’ रेडिअाे जाॅॅकी, कैद्यांचे करतो मनोरंजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘लगे रहाे मुन्नाभाई’ चित्रपटात अभिनेत्री विद्या बालनसाेबत काही काळ रेडिअाे जाॅकीची भूमिका बजावणारा अभिनेता संजय दत्त सध्या पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातही प्रत्यक्षात याच भूमिकेत असून ताे कैद्यांचा विरंगुळा करत अाहे. संजूबाबाच्या अावाजाने काही काळापुरते का हाेईना कैदी अापले शिक्षेचे बंधन विसरून रेडिअाेशी एकरूप हाेताना िदसत अाहेत.

कैद्यांकरिता येरवडा कारागृहात अंतर्गत कम्युनिटी रेडिअाे दरराेज एक तास चालवला जाताे. दिवसभराच्या दिनक्रमात कैद्यांचे दुपारचे काम संपल्यानंतर त्यांना थाेडा वेळ विश्रांती िदली जाते. यादरम्यान रेडिअाेच्या माध्यमातून कैद्यांचे मनाेरंजन केले जाते. गेल्या काही महिन्यांपासून संजय दत्त या ठिकाणी बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या अाराेपावरून शिक्षा भाेगत अाहे. ताेही रेडिअाेच्या या उपक्रमात सहभागी झाला अाहे. रेडिअाे जाॅकीच्या भूमिकेतून ताे कैद्यांशी संवाद साधत अाहे. या रेडिअाेच्या कार्यक्रमात काेणत्या गाेष्टींचा समावेश करावयाचा, राेजचा विषय काय ठरवायचा याबाबत रेडिअाेप्रमुख व सहकारी यांच्याशी चर्चा करून संजूबाबा कार्यक्रमाची अाखणी करताे.रेडिअाे स्टेशनची पहिली अाेळख ही रेडिअाे जाॅकी (अारजे) असते. त्याचप्रमाणे कारागृहातील रेडिअाेची अाेळख अाता संजूबाबाशी िनगडित झाली अाहे.

दीड महिनाच अारजेच्या भूमिकेत
संजय दत्त यास पाच वर्षांची शिक्षा झालेली असून सदर शिक्षा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी संपत अाहे. अाता केवळ पुढील दीड महिना त्याचे कारागृहात वास्तव्य असेल. त्यामुळे पुढील केवळ दीड महिनाच ताे रेडिअाे जाॅकीच्या माध्यमातून कैद्यांची करमणूक करणार अाहे.