आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलमध्ये पत्नी मान्यताच्या मनी ऑर्डरवर जगत आहे संजूबाबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याच्या आरोपात पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तला दिलेले काम योग्य रित्या करता येत नाही. त्यामुळे त्याचा रोजगार बुडत आहे. याचा परिणाम त्याला गरजेच्या असलेल्या वस्तू विकत घेता येत नाहीत.

काही दिवसांपूर्वी संजूबाबा अक्षरओळख विसरल्याची चर्चा होती. त्यामुळे तो त्याला आवश्यक असलेल्या वस्तू स्वतः जेलच्या कँटीनमधून घेऊ शकत नव्हता. आता मात्र, पैशांची चणचण बॉलिवूडच्या खलनायकाला सतावत आहे. मध्यंतरी त्याची पत्नी मान्यता त्याला भेटण्यासाठी आली होती, तेव्हा त्याने त्याची ही समस्या तिला सांगितली. मान्यताने याबाबत जेल अधिका-यांचा सल्ला घेतला आणि संजुबाबाच्या समस्येचे समाधानही तिला मिळाले.

कारागृहांच्या नियमांनुसार कैद्यांचे नातेवाईक दर महिना 4 हजार रुपये मनी ऑर्डरने त्यांना पाठवू शकतात.