आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजयला पुन्हा पॅरोल मंजूर, मान्यताच्या टीबीमुळे तब्बल दोन महिने कारागृहाबाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे – पत्नी मान्यताला टीबी झाल्यामुळे तिची देखभाल करण्यासाठी आणखी 30 दिवसांची संचित रजा देण्यात यावी, अशी मागणी करणा-या अभिनेता संजय दत्तवर पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी पुन्हा एकदा मेहरबानी केली आहे. संजय गेल्या 21 डिसेंबरपासून 30 दिवसाच्या सुटीवर आहे, त्यात आज आणखी 30 दिवसाची सुटी वाढवून दिली आहे.
संजयने 7 जानेवारीला 30 दिवसाच्या रजेसाठी पुन्हा अर्ज दाखल केला होता. त्यावर येरवडा जेल प्रशासन व विभागीय आयुक्तांनी आज संजयची सुटी संपायच्या आदल्या दिवशी हिरवा कंदिल दाखवला. पुण्याच्या विभागीय आयुक्तांवर सुटी मंजूर करण्यासाठी माध्यमांचा व जनतेचा दबाव होता. त्यामुळेच आज सुटी संपायच्या आदल्या दिवशी म्हणजे शेवटच्या क्षणी सुटी मंजूर केली. संजयला 6 डिसेंबरला दुस-यांदा संचित रजा मंजूर केली होती. तेव्हाच मोठा वाद निर्माण झाला होता व चर्चा झडली होती.
संजयला असामान्य वागणूक देण्यात येत आहे तसेच त्याला तुरुंगात दारू, चांगले जेवण मिळत असल्याचाही आरोप विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला होता. त्यामुळे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र संजयची पत्नी मान्यताला टीबी झाला असून, तिची काळजी घेण्याची नितांत आवश्यकता असल्याचे डॉक्टरांचे पत्रच संजयने विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाला सादर केले आहे.
आणखी पुढे वाचा, संजयचे काय आहे म्हणणे यावर...