आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sanjay Dutt Lands A Role In Yerawada Jail Cultural Event

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुरुंगातही संजय दत्तच्या अभिनयाचे रंग!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - चित्रपटांतून विविध भूमिका साकारणारा अभिनेता संजय दत्त आता येरवडा तुरुंगातही आपल्या अभिनयाचे पैलू दाखवण्याच्या विचारात आहे. तुरुंग प्रशासनाच्या वतीने तुरुंगातील कैद्यांच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात तो सहभागी होऊन अभिनयाचे रंग उधळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दत्त सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. येथील तीन महिन्यांच्या वास्तव्यानंतर आता संजूबाबा आपल्या मूळ क्षेत्राकडे लक्ष देणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या काळात येरवड्यातील 30 कैद्यांचा समूह सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार असून त्याची तयारी सध्या येरवडा तुरुंगात जोरात सुरू आहे. गीतगायन, नाटुकली आणि नृत्याचा कार्यक्रम कैदी सादर करणार आहेत. नुकताच कैद्यांनी एक मे रोजीही कार्यक्रम सादर केला होता.

या पार्श्वभूमीवर अभिनेता संजय दत्तनेही कार्यक्रमात सहभागी होण्याची तयारी आणि इच्छा प्रदर्शित केली. मात्र, कार्यक्रम मराठी भाषेत असल्याने संजूबाबाला नेमकी कोणती भूमिका द्यावी, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

संजूबाबाचे नाटक
एक नाटुकल्यात संजय दत्त भूमिका करणार आहे. एक गाववाला आपल्या परदेशात राहून येथील संस्कृती विसरलेल्या मित्राला विविध सादरीकरणांतून आपल्या संस्काराचा परिचय घडवतो, अशी पार्श्वभूमी असलेला कार्यक्रम होणार आहे. त्यात संजय विदेशी मित्राची भूमिका साकारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.