आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt May Be Shifted To Mumbai For Health Reason

संजय दत्तला मुंबईला हलवणार ?, प्रकृती खराब असल्‍याचे कारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तला उपचारांसाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची चर्चा सोमवारी होती. मात्र, येरवडा कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांनी त्याचा इन्कार केला.

संजयला रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शनिवार आणि रविवारी त्याच्या विविध तपासण्या केल्या होत्या. अतिधूम्रपान आणि उच्च रक्तदाबामुळे संजय दत्तला त्रास झाल्याचे ससूनच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, पेरीफेरल आर्टिरियलच्या (शरीराच्या विविध अवयवांना रक्तपुरवठा कमी पडणे) विकाराने तो ग्रासल्याने सिटी अँजिओग्राम तसेच आर्टिरियल टेस्ट करणे अपरिहार्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.