आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी मान्यतासोबत तीन महिने घालविल्यानंतर संजय दत्त पुन्हा येरवडा कारागृहात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पत्नी मान्यताच्या आजारपणाचे कारण देत येरवडा कारागृहातून पॅरोलवर बाहेर पडलेला 1993 मुंबई बॉम्बस्फोटात दोषी आढळलेला अभिनेता संजय दत्त तीन महिन्यानंतर कारागृहात परतला. दुपारी 1 च्या सुमारास तो मुंबईतून पुण्याकडे रवाना झाला होता. तो दुपारी तीननंतर येरवडा कारागृहात पोहचला. तब्बल तीन महिन्यांची सुटी मिळाल्याने सर्व स्तरांतून मुन्नाभाईवर टीकेची झोड उठली होती. अखेर सरकारने पॅरोल व फर्लोच्या नियमांत बदल करून घेतला आहे. त्यामुळे आता नव्या नियमानुसार, संजय दत्त आता मार्च 2015 पर्यंत पॅरोलची सुटी घेऊ शकणार नाही.
संजय दत्त पॅरोल प्रकरणात कारागृह कक्षाचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याची तक्रारी करण्यात आल्या. त्यावर राज्य सरकारने पॅरोल व फर्लोच्या नियमांत बदल केले. मात्र, नव्या नियमांना आव्हान देत कोर्टात अनेकांनी याचिका दाखल केल्या. तरीही कोर्ट सरकारच्या बाजूने उभे राहिले. एखाद्या कैद्याला पॅरोल देण्याचा अधिकार आहे. मात्र ते पूर्ण स्वातंत्र्य नाही असे सांगत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारच्या बाजूने निर्णय दिला. आता नव्या नियमानुसार कोणत्याही प्रकारच्या कैद्याला वर्षातून एकदाच पॅरोलसाठी अर्ज दाखल करता येईल.
संजय गेल्या वर्षीपासून किती दिवस राहिला तुरुंगात, वाचा पुढे...