आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्त मार्च महिन्यात कारागृहाबाहेर पडणार, शिक्षेत सवलत नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मुंबईतील १९९३ च्या बाॅम्बस्फाेटावेळी बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त मार्च २०१६ मध्ये बाहेर येईल. मार्च महिन्यात त्याची शिक्षा पूर्ण होणार असून पहिल्या किंवा दुसऱ्या अाठवड्यात ताे कारागृहाबाहेर पडेल, अशी माहिती राज्य कारागृह प्रशासनातील वरिेष्ठ अधिकाऱ्यांनी िदली. दरम्यान, संजयला शिक्षेत कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही, असे गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

एखाद्या कैद्यास ११४ िदवसांची रजा िमळत असते. सामान्य कैद्याला मिळणारी सवलतच संजयला देण्यात अाली. तुरुंग अधीक्षक एखाद्या कैद्याची शिक्षा ३० िदवस, उपमहानिरीक्षक ६० िदवस, तर अतिरिक्त पाेलिस महासंचालक ९० दिवसांची शिक्षा माफ करू शकतात. मात्र, संजयला या ितघांकडूनही काेणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.