आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutta News In Marathi, Parol, Yerwada Prison, Divya Marathi

पॅरोलची मुदत संपल्याने आज मुन्नाभाई कारागृहात परतणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पत्नी मान्यताच्या आजारपणाचे कारण देत येरवडा कारागृहातून पॅरोलवर बाहेर पडलेला 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी संजय दत्त शनिवारी तुरुंगात परतणार असल्याची माहिती कारागृहाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी दिली. तब्बल तीन महिन्यांची सुटी मिळाल्याने सर्व स्तरांतून मुन्नाभाईवर टीकेची झोड उठली होती.


18 मे 2013 रोजी संजयने मुंबई न्यायालयात शरणागती पत्करली होती. त्यानंतर त्याला येरवडा कारागृहात आणण्यात आले. मात्र, सतत संचित रजा व पॅरोल रजा त्याला वाढवून मिळत असल्याने हा चर्चेचा विषय ठरला. आजवर संजय एकूण 305 दिवसांपैकी 117 दिवस रजेवरच आहे. 21 डिसेंबरला सुरुवातीला एक महिन्याची पॅरोल घेऊन संजय बाहेर आला. मात्र, त्यानंतर पुन्हा जानेवारी व फेब्रुवारीत विभागीय आयुक्तांकडून एक-एक महिन्याची रजा वाढवून घेत तो कारागृहाबाहेरच राहिला. त्याची वाढीव रजा शुक्रवारी संपत आहे. त्यामुळे शनिवारी तो परतणे अपेक्षित असल्याचे धामणे म्हणाले.