आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutts Furlough Ends Today, Will Back In 4 Hour In Yerwada Jail

संजय दत्तला आणखी 14 दिवसांची रजा नामंजूर? \'संजुबाबा\' आज पुन्हा तुरुंगात येणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- गेल्या 14 दिवसांपासून येरवडा तुरुंगाबाहेर फर्लोच्या रजेवर असणारा संजय दत्त आज पुन्हा येरवडा तुरुंगात दाखल होत आहे. संजय 23 डिसेंबर रोजी 14 दिवसासाठी फर्लोच्या रजेवर बाहेर आला होता. त्यानंतर संजयने आणखी 14 दिवसाची सुटी मागितली होती. मात्र, त्याला सुटी देण्यास नकार देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयने आपल्या आजरपणाचे कारण सांगून आणखा 14 दिवसाची रजा जेलप्रशासनाकडे मागितली होती. त्यानंतर जेलप्रशासनाने पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे संजयचा अर्ज पाठवला होता. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी मुंबई पोलिसांना संजयच्या अर्जाचा विचार करताना त्याच्या आजारपणाच्या सत्यतेची पडताळणी करण्यास सांगितले होते. मात्र, संजयला विशेष काहीही त्रास नसल्याचे मुंबई पोलिसांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना अहवाल दिल्याचे कळते. त्यामुळे संजयला आणखी 14 दिवसाची सुट्टी देण्यास परवानगी नाकारण्यात आली. संजय मुंबईहून पुण्याकडे निघाला सुरक्षेच्या कारणास्तव याबाबत काहीही माहिती लीक होणार नाही याची जेलप्रशासन काळजी घेत आहे. संजय दुपारी तीन नंतर येरवडा कारागृहात परतेल असे सांगितले जात आहे.
गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी संजय दत्तला मिळणा-या रजेबाबत शंका व्यक्त करताना चौकशी करण्यात येईल असे म्हटले होते. मात्र, त्यानंतर शिंदेंनी संजयला नियमानुसारच सुटी देण्यात आल्याचे म्हटले होते. संजयला आणखी 14 दिवसाची सुटी दिल्यास लोकांत नाराजी व्यक्त होईल या भीतीने संजयला सुटी नकारल्याचे समजते आहे.