आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay May Celebrate Chrismas & New Year With Family

पॅरोल मंजूर झाल्यानंतर 15 दिवसांनी संजय दत्त जेलबाहेर, मुंबईत पोहचला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मुंबई बॉम्बस्फोटच्या काळात बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा 30 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आली आहे. पत्नी मान्यता आजारी असल्याचे सांगून त्याने ही रजा मागितली होती ती विभागीय आयुक्तांनी 6 डिसेंबर रोजी मंजूर केली होती. मात्र त्यावर वाद झाल्यानंतर काही काळ संजय तुरुंगातच थांबला होता. मात्र आज सकाळी 10 वाजता अचानक संजय आपल्या लवाजम्यासह मुंबईकडे रवाना झाला. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास तो मंबईतील घरी पोहचला.
देशातील सर्वात मोठा बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी आढळलेला व त्यात शिक्षा झालेल्या संजयला येरवडा तुरुंग प्रशासनाने दोन महिन्यांत दुसर्‍यांदा रजा मंजूर केली आहे. त्यावरून मागील आठवड्यात मोठा वाद उद्भवला होता. कारण त्याची पत्नी मान्यता एका पार्टीत सहभागी झाल्याची चित्रफीत वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केली होती. काही कैद्यांनीही यावर आक्षेप घेत निदर्शने केली. वातावरण तापल्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही तुरुंग प्रशासन संजूला विशेष वागणूक देत आहे का, याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली होती. दरम्यान, 6 डिसेंबरला रजा मंजूर होऊनही तो तुरुंगातच होता. अखेर आज पंधरा दिवसांनी तो तुरुंगाबाहेर पडला व मुंबईकडे रवाना झाला.
शिक्षा झालेल्या कैद्याची पॅरोलवर सुटका करण्याचा मुद्दा दीर्घकाळापासून वादाचा विषय राहिला आहे. अभिनेता संजय दत्तला दुसर्‍यांदा पॅरोल दिल्याने पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता संजय पुन्हा एकदा जेलच्या बाहेर आला आहे. तर मग जाणून घेऊ नेमकी कशी असते पॅरोलच्या रजेची प्रक्रिया...