आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sanjay Sonwane Fill Form For The Sammalan Chairpan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संमेलन अध्यक्षपदासाठी संजय सोनवणी यांचा अर्ज दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांचे नाव सुचवणारा अर्जही महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दाखल झाला आहे. ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांचा अर्ज यापूर्वीच दाखल झाला आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदासाठी दोन लेखक इच्छुक असल्याचे सुरुवातीच्या टप्प्यात स्पष्ट झाले.


साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार कुठल्याही घटक संस्थेला संमेलन अध्यक्षपदासाठी केवळ तीनच नावे सुचवता येतात. त्यापैकी मसापकडे दोन नावे आता दाखल झाली आहेत. नाव सुचवण्याची अखेरची तारीख 17 ऑगस्ट आहे. त्यापूर्वी तिसरे नाव कुणाचे येणार, याविषयी साहित्य वर्तुळात उत्सुकता आहे. सोनवणी यांच्या अर्जावर सूचक म्हणून शंकर सारडा तर अनुमोदक म्हणून हरी नरके, विनोद सोनवणी, जालिंदर चांदगुडे, अनिल कुलकर्णी व अशोक सातपुते यांनी स्वाक्ष-या केल्या आहेत. मसापच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्याकडे सोनवणी यांनी अर्ज दिला.