आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: टाळ-मृदंगाच्या गजरात माऊलींची अलंकापुरी दुमदुमली!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशीमाळ, कपाळी बुक्का अन्‌ मुखाने हरिनामाचा जयघोष करीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वैष्णवांच्या मेळाव्याने इंद्रायणी तीर, अलंकापुरी आणि माउली मंदिर प्रांगण दुमदुमून गेले. - Divya Marathi
खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशीमाळ, कपाळी बुक्का अन्‌ मुखाने हरिनामाचा जयघोष करीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वैष्णवांच्या मेळाव्याने इंद्रायणी तीर, अलंकापुरी आणि माउली मंदिर प्रांगण दुमदुमून गेले.
पुणे- खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळी बुक्का, गळ्यात वीणा आणि ओठांवर ज्ञानोबा माउलींचा जयघोष, अशा रूपात लक्षावधी वारक-यांच्या साक्षीने आळंदी येथून गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. पालखी सोहळ्याचे मालक व सेवेकरी यांच्यात झालेल्या मानापमान नाट्यामुळे यंदा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला रात्रीच्या 10-11 वाजल्या. प्रदक्षिणेनंतर माउलींचा पालखीसोहळा आळंदी येथेच आजोळघरी विसावला. आज सकाळी (शुक्रवारी) श्रीचा पालखी सोहळा पुण्यानगरीकडे मार्गस्थ झाला आहे.

आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव ! दैवताचे नाव सिद्धेश्‍वर !!
चौर्‍याऐंशी सिद्धांचा सिद्धबेटि मेळा! हा सुखसोहळा काय वर्णु !!
या संत वचना प्रमाणे अलंकापुरीतील श्रीचे पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहात व लाखो भाविकांच्या मांदियाळीत हरीनाम गजर करीत श्रीच्या पालखीने गुरुवारी रात्री उशिरा प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी नित्यनैमित्तिक श्रीची गुरुवारची पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाली. यावर्षी वैभवी श्रीचे अश्व देखील गुरुवारच्या पालखी मंदिर प्रदक्षिणेत सहभागी झाले. गुरुवारच्या पालखी मंदिर प्रदक्षिणे दरम्यान देखील हरीनाम गजर अधिकाधिक रंगला. ताळ, मृदंग, वीणेच्या झन्काराचा त्रिनाद, आल्हाददायक वातावरण हरीनाम उत्साह वाढवीत राहिला. खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशीमाळ, कपाळी बुक्का अन्‌ मुखाने हरिनामाचा जयघोष करीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वैष्णवांच्या मेळाव्याने इंद्रायणी तीर, अलंकापुरी आणि माउली मंदिर प्रांगण दुमदुमून गेले.

ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थानसाठी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, प्रमुख विश्‍वस्त डॉ. प्रशांत सुरू, विश्‍वस्त शिवाजीराव मोहिते पालखी सोहळ्याचे प्रमुख श्यामसुंदर मूळे, राजेंद्र आरफळकर, अश्व सेवेचे मानकरी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरदार, श्रीचे सेवक चोपदार बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर, आळंदीचे अध्यक्ष रोहिदास तापकीर, प्रांत हिम्मतराव खराडे, उपविभागीय अधिकारी संजय पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. श्रीचे प्रस्थान दिनाचे कार्यक्रमास भल्या पहाटे घंटा नादाने प्रारंभ झाला. अभिषेक पूजा, दुधारती, भक्तांच्या महापूजा दर्शन, महानैवेद्या, पुरणाची आरती, भाविकांचे दर्शन झाले. त्यानंतर गुरुवारची पालखी मंदिर प्रदक्षिणा, आरती झाली,प्रस्थान निमित्त श्रीना नवीन वस्त्रालनकर पोषाक रुपात सजविण्यात आले त्यानंतर प्रस्थानच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. दरम्यान आळंदी मंदिरात वारकरी भाविकांचा नाम गजर जय घोष दिंडीने हरिनामाचे गजर टिपेला पोहचला.
प्रस्थांनचा सोहळा होताच श्रीचे चोपदार यांनी पालखी प्रस्थानसाठी आळंदीकर नागरिकांनी खांद्यावर उचलण्याचा इशारा होताच श्रीची पालखी माउली-माउली नाम जय घोष करीत खाद्यावर नाचवत घेतली. तुतारीने शीग फुकताचा विना मंडपातून पालखीचे रात्री उशिरा शाही लवाजम्यासह प्रस्थान झाले. रात्री श्रीचा पहिला मुक्काम आळंदीत देवस्थानने विकसित केलेल्या आजोल घरी समाज आरतीने झाला. गांधी परिवाराने पूजा प्रथेने झाली.
पुढे पाहा, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील क्षणचित्रे...