पुणे- महाराष्ट्राचे कुलदैवत श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज (सोमवारी) सकाळी अनुक्रमे लोणी काळभोर व सासवडकडे रवाना झाल्या. रविवारी दिवसभर पुणेकरांचा सेवाभावी पाहुणचार घेऊन वारकरी पुढच्या प्रवासाकडे मार्गस्थ झाले. नाना पेठेतून पालख्या हडपसरकडे रवाना झाल्या. वानवडी येथे नागरिकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यानंतर दोन्ही पालख्यांनी काही वेळ हडपसरमध्ये विसावा घेतला. हडपसरवासियांचा पाहुणचार घेतल्यानंतर पालखी आणि वारकरी पुढे मार्गस्थ झाले.
हडपसर परिसरातील नागरिकांनी पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली. दुपारी 12 नंतर दोन्ही पालख्या मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फुरसुंगी मार्गे दिवे घाट पार करून सासवडकडे मुक्कामी स्थळी रवाना झाली. दुपारी चार सुमारास दिवा घाटातून पालखी पुढे सरकली. त्यावेळी घाटाचे विहंगम दृश्य दिसत होते. त्यावेळी शेकडो जण हे विहंगम दृश्य टिपण्यासाठी सरसावले होते. तर, संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर-पुणे महामार्गावरून लोणी काळभोर येथील मुक्काम स्थळी सायंकाळी 6 पर्यंत पोहचेल. तर, ज्ञानेश्वरांची पालखी सासवडच्या मुक्कामस्थळी 7 पर्यंत पोहचेल.
पुढे पाहा, आजच्या दिवसातील पालखीचे छायाचित्रे....