आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरा तो एकची धर्म! संत तुकारामांच्या पालखीचा पहिला विसावा आनगडशाह बाबाच्या दर्ग्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरणारे लाखो वारकरी, विठोबा-रखुमाईच्या जयघोषात दुमदुमलेली वारी आणि पारंपरिक उत्साहात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज अनगडशाह बाबाच्या दर्ग्यात विसावा घेतला. गेल्या तीनशे बत्तीस वर्षांपासून तुकाराम महाराजांची पालखी देहूतून प्रस्थान केल्यनंतर पहिला विसावा याच ठिकाणी घेते. त्यातच यंदा मुस्लिमाचा पवित्र रमजान महिना असल्यामुळे या भेटीला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे. 
 
जाती धर्मात असलेल्या कलहांना छेद देणारे अनेक प्रसंग वारीत पहायला मिळत असतात. तुकाराम महाराज पालखीचा अनगडशाह बाबांच्या दर्ग्यातील विसावा हा सामाजिक एकतेसह धर्माच्या पलिकडे असलेल्या भक्तीचा प्रत्यय देतो. त्यातच मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्यानं तुकाराम महाराजांच्या पालखीच्या या भेटीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे यंदा बाबांना दूध आणि साखरेचे नैवेद्य दाखविण्यात आले. अनगडशाह बाबा हे तुकाराम महाराजांचे शिष्य मानले जातात. जगदगुरू तुकाराम महाराजांची विठ्ठल माउली प्रती असलेली अजोड भक्ती, आसक्ती आणि महाराजांचा दान्शुर्पना यामूळ या मुस्लीम संताने जगद्गुरू तुकाराम महाराजांचे शिष्यत्व पत्करल्याची आख्यायिका आहे 

आजही संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला विसावा अनगडशाह बाबा दर्ग्यातच घेतला. या ऐक्याच आणखी एक प्रतीक म्हणजे या दर्ग्याच्या पुजाऱ्याचा मान मुसुगडे कुटुंबाकडे आहे. त्यांची तिसरी पिढी  अहोरात्र दर्ग्याची सेवा करत आहे.