आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत तुकाराम महारांजांच्या पालखीचे उद्योगनगरी पिपरी चिंचवडमध्ये आगमन...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- उद्योग नगरी अर्थात पिंपरी-चिंचवडमध्ये आज सायंकाळी संत तुकाराम महाराजांच्या पालखी टाळ मृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. तुकोंबाच्या जयघोषात निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात दिंडी दाखल झाली. महापालिकेच्या वतीने महापौर नितीन काळजे आणि आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या हस्ते दिंडी प्रमुखांना ताडपत्री देवून स्वागत करण्यात आले.
 
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठलरुख्मीनी मंदीरात होणार आहे. निगडी आकुर्डीतील नागरिकांनी पालखीचे स्वागत केले. तसेच, विविध संस्थांनी वारकऱ्यासाठी पाणी, अन्न, फळांचे वाटप केले.
 
अलंकापुरीत ज्ञानेश्वरांच्या पालखीची लगबग...
अलंकापुरीत ज्ञानेश्वर माऊलीच्या 185 व्या पालखी सोहळ्याला पहाटे सव्वा 4 वाजता काकड आरतीने सुरुवात झाली. या पालखी सोहळ्यात सुमारे 450 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. यामध्ये हैबतबाबा यांच्यातर्फे आरती होणार असून त्यानंतर पादुका पालखीत ठेवण्यात येणार आहेत. तसेच मंदिररात पालखीच्या पुढे 27 आणि मागे 20 अश्या 47 दिंडी प्रथम मंदिरात सोडण्यात येतील. त्यानंतर इतर दिंड्याना प्रवेश देण्यात येईल.  मुख्य सोहळ्याला दुपारी दोनपासून सुरुवात होणार आहे. तर 4 च्या सुमारास पालखीचे प्रस्थान होईल. आज आळंदी येथेच पालखी मुक्कामाला थांबणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता पुण्याकडे  पालखी प्रस्थान होईल.
 
पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...