आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देहूनगरी बुडाली भक्तीरसात, पाहा तुकोबांच्या पालखीची छायाचित्रे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वारक-यांच्या साथीने माजी मंत्री बबनराव पाचपुते व हर्षवर्धन पाटील फुगड्या खेळताना... - Divya Marathi
वारक-यांच्या साथीने माजी मंत्री बबनराव पाचपुते व हर्षवर्धन पाटील फुगड्या खेळताना...
पुणे- पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या लक्षावधी वारक-यांच्या मेळ्याने बुधवारी तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले. ‘दिंड्या पताका वैष्णव नाचती’ या ओळी सार्थ ठरवणारे भक्तिरसमय वातावरण बुधवारी पहाटेपासून देहूनगरीने अनुभवले. ‘ग्यानबा तुकाराम’, ‘विठ्ठल विठ्ठल’ यांच्या गजरात वारकरी पंढरीच्या दिशेने प्रस्थान झाले. आज सकाळी तुकोबाची पालखी देहू येथील इनामदार वाड्यातून पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली. आकुर्डी येथे महानगरपालिकेच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत केले.
देहू संस्थानच्या वतीने बुधवारी पहाटे साडेचारपासून पारंपरिक पद्धतीने प्रस्थानविधींना सुरुवात झाली. काकडआरती, महापूजा, दिलीप देहूकरांचे काल्याचे कीर्तन, महाप्रसाद, पाद्यपूजा आदी धार्मिक विधी पहाटेपासून प्रचंड गर्दीत सुरू होते. यंदा पाद्यपूजेचा मान ज्येष्ठ वारकरी सूर्यभान पांडुरंग बोंबले यांना मिळाला. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पत्नी गिरिजा बापट यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजा झाली. या वेळी हर्षवर्धन पाटील, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते. वारक-यांच्या साथीने पाचपुते आणि हर्षवर्धन पाटील यांनीही फुगड्या खेळल्या.
रांगोळ्यांच्या पायघड्या-
पंढरीच्या दिशेने जाणा-या वाटा रांगोळ्यांच्या पायघड्यांनी सजवण्यासाठी ‘समर्थ ग्रुप’च्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून प्रयत्न सुरू केले आहेत. यंदा रांगोळी पायघड्यांचा विश्वविक्रम करण्याचा निर्धार ग्रुपने व्यक्त केला आहे. एक किलोमीटरपेक्षाही मोठी रांगोळी काढण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. त्यासाठी तीन टन रांगोळी, गुलालाची पोती आणि अन्य 12 रंगांची रांगोळी तयार ठेवण्यात आली आहे.
पुढे पाहा, संत तुकाराम महाराजांच्या पालखीने बुधवारी पंढरपूरकडे पस्थान ठेवले त्यावेळची क्षणचित्रे....
बातम्या आणखी आहेत...