आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: तुकोबांच्या पालखीला मेंढ्याचे रिंगण, वाचा काय आहे श्रद्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- बारामती तालुक्‍यातील काटेवाडी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात मेंढयांचा रिंगण सोहळा बुधवारी थाटात साजरा झाला. रोगराईपासून अभय मिळण्यासाठी या रिंगणाची परंपरा आहे. काटेवाडी येथील धनगर समाजातील मेंढपाळ या सोहळ्यात मोठ्या उत्‍साहाने सहभागी होतात. तुकोबांचे आर्शीवाद मिळाल्‍यानंतर मेढ्यांना रोगराईचा त्रास होणार नाही, अशी स्थानिक मेंढपाळांची श्रध्दा आहे.
रिमझिम पावसाच्या सरी झेलत बुधवारी ग्यानबा तुकारामाचे जयघोष करत तुकोबांची पालखी काटेवाडी येथे पोहोचली. बारामती मुक्कामानंतर दुपारी काटेवाडीत भोजन व विश्रांतीनंतर मेंढ्याचे रिंगण झाले. परिसरातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात तुकोबांच्या दर्शनासाठी जमले होते. उदया सकाळी सणसर मुक्कामानंतर बेलवाडी (ता.इंदापूर) येथे संत तुकोबांच्या पालखीचे पहिले उभे गोल रिंग होणार आहे.
छायाचित्र- स्वप्निल शिंदे, बारामती
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, असे झाले मेंढ्यांचे रिंगण..
बातम्या आणखी आहेत...