आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- बेदरकार एसटी बस चालवून आठ जणांचा बळी घेणा-या पुण्यातील चालक संतोष माने प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी मोठ्या प्रमाणात त्रुटी ठेवल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा खोटा गुन्हा दाखल करून स्वत:ला अनुकूल होतील अशीच बनावट कागदपत्रे व दोषरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे, असा आरोप बचाव पक्षाचे वकील धनंजय माने यांनी मंगळवारी न्यायालयात केला. या वेळी न्यायालयाने तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह मोहिते यांची साक्षही नोंदवली.
सत्र न्यायाधीश एम.डी.शेवाळे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. मोहिते म्हणाले की घटनेनंतर माने याला येरवडा कारागृहाच्या रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्याचा मेडिकल अहवालही तयार करण्यात आला. पोलिसांनी त्याच्या फोन डिटेल्सची तपासणी केली, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले, आरोपीचे व सर्व मृतांचे घटनेवेळचे कपडे गोळा केले तसेच एसटीच्या चाकाचे व इतर 12 नमुने घेऊन ते रासायनिक प्रयोगशाळेकडे पाठवले. लष्कराचे पोलिस हवालदार दीपक काकडे यांनी त्या वेळी एसटीवर फायरिंग केले होते, संबंधित कार्बाईन व तीन रिकामे कागदपत्रे तपासणीकरिता पाठवले आहेत.
महापालिकेकडून पोलिसांना असहकार्य
संतोष माने याने 25 जानेवारी 2012 रोजी स्वारगेट चौकात बेदरकारपणे एसटी चालवून आठ जणांचा जीव घेतला व 32 जणांना जखमी केले. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी तपास कामासाठी पुणे महापालिकेचे नगर अभियंता व दोन इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे यांच्याकडे घटनेच्या फुटेजची मागणी केली होती. माध्यमांनी पोलिसांना फुटेज उपलब्ध करून दिले, पण मनपाने अखेरपर्यंत चित्रित फुटेज दिले नसल्याची साक्ष सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह मोहिते यांनी न्यायालयात दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.