आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santosh Mane Not Mental Patient: Yerwada Hospital Doctor Report

‘एसटीचालक संतोष मानेला भास होत नाहीत’:येरवडा रुग्णालयातील डॉक्टरांचा अहवाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘बेदरकारपणे बस चालवून पुण्यात नऊ जणांचे बळी घेणारा एसटीचालक संतोष माने याला कोणत्याही स्वरूपाचे भास होत नाहीत’, असा अहवाल येरवडा रुग्णालयातील डॉक्टरांनी बुधवारी न्यायालयात सादर केला. संतोष मनोरुग्ण असल्यामुळे त्याच्या हातून हे कृत्य घडल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला होता. मात्र, डॉक्टरांच्या अहवालामुळे बचावकर्त्यांचा दावा खोटा ठरला आहे.

संतोष मनोरुग्ण असल्याचा दावा त्याच्या वकिलांकडून करण्यात येत होता, परंतु घटनेनंतर येरवडा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची दहा दिवस पाहणी करून अहवाल सादर केला आहे. त्यात संतोषला कोणत्याही स्वरूपाचे भास होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशीचे संतोषचे रक्ताने माखलेले कपडे, बिल्ला व मोबाइल न्यायालयात दाखवले असता त्याने ते आपलेच असल्याचे मान्य केले. पुढील सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या दिवशी संतोषवर उपचार करणारे सोलापूरातील डॉ. दिलीप बोरूटे यांची साक्ष घेतली जाईल.