आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरदार होळकरांचा शिलालेख उजेडात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पेशवाईचा आधारस्तंभ आणि पेशव्यांच्या उत्तरेकडील राजकारणातील महत्त्वाचा घटक असलेल्या सरदार मल्हारराव होळकर यांच्या कुटुंबातील स्त्रियांची व अन्य नातेवाइकांची अधिकृत माहिती देणारे दोन शिलालेख पुण्याजवळच्या परिसरात आढळून आले आहेत. युवा संशोधक महेश तेंडुलकर यांनी हे शिलालेख प्रकाशात आणले आहेत. या शिलालेखांतील मजकुरात मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमी, त्यांची कन्या उदाबाई, जावई, नातू यांचे उल्लेख असून ऐतिहासिकदृष्ट्या ही माहिती महत्त्वाची मानली जात आहे.
पुणेकर संशोधक आणि इतिहासाचे अभ्यासक महेश तेंडुलकर यांनी पुण्याच्या ईशान्येकडे सुमारे 63 किलोमीटर अंतरावरील निगुडसर या ठिकाणी या शिलालेखांचा शोध लावला आहे. येथील एका स्मारकशिलेवर आणि घोड नदीच्या घाटावरील पाषाणावर हे शिलालेख तत्कालीन मराठी भाषेत कोरले आहेत. या शिलालेखांतील मजकुराचा आजच्या मराठी भाषेतील अनुवाद असा आहे - ‘पराक्रमी महाराज मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमी यांची कन्या उदाबाई, उदाबाईचे पती बाबूराव मानाजी पाटील वाघमारे यांचा पुत्र अवचितराव बाबूराव वाघमारे पाटील याने पितृ उद्धरणार्थ आणि परलोकसाधनार्थ ही छत्री 4 एप्रिल 1789 या दिवशी बांधली.’ हाच मजकूर नदीघाटावरील शिलालेखातही सापडला आहे. अशा प्रकारचा
नेमके महत्त्व काय आहे ?
शिलालेखात प्रथमच कौटुंबिक उल्लेख
गौतमीपासून तीन पिढ्यांचा नामनिर्देश
माता-पित्याकडील आजोळघरचा उल्लेख
उत्तरेकडे संवत्सर वापरले जाते, येथे सौम्य संवत्सराचा उल्लेख
मल्हारराव, गौतमी, उदाबाई, बाबूराव, मानाजी, अवचितराव यांचा उल्लेखऐतिहासिक शिलालेखातील प्रत्यक्ष मजकूर पुढीलप्रमाणे
श्रीगणेशाय नम: प्रतापि महाराज मळहारराजा जसि लक्षुमिगौतमा नाम तया उदरी रत्नकन्या विराजे उदाबाई हे नाम पृथ्वीत गाजे. सके 1711 सौम्य नाम संवत्सरे चैत्र शुद्ध 9 नवमी मंदवासरे ते दीवसी बाबूरावा वल्द (वडील) मानाजी पाटील वाघमारे मोकदम तक्षिम दिड मौजे खडकी तर्फ महाळुंगे तस्ये भार्या उदाईवा पुत्र अवचितराव पाटील वाघमारे याणी पित्रृ उद्धारार्थ परलोकसाधनार्थ छत्रीचे काम केले असे.