आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उंब्रजमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ, 86 वर्षीय महिलेची हत्या करून 1 कोटी लुटले!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- सातारा जिल्ह्यातील कराड परिसरातील उंब्रज येथे दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. दरोडेखोरांनी दुकाने, घरे फोडत सुमारे 1 कोटींचा ऐवज लुटून नेला आहे. दरम्यान, दरोडा टाकताना एक आजी जागी झाल्याने तिच्या तोंडावर उशी दाबून तिची हत्या करण्यात आली. जैनुबी करीम मुल्ला (वय 86) असे मृत महिलेचे नाव आहे. दरोडेखोरांनी एक टेम्पो घेऊन हा दरोडा टाकला आहे. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे.

 

आज मध्यरात्री हा दरोडा टाकण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी हजर झाले. यानंतर ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथक आणले. पोलिस आता तपास करत आहेत. मात्र, या घटनेने उंब्रज परिसरात खळबळ माजली आहे. 

बातम्या आणखी आहेत...