आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतीश शेट्टी खून प्रकरण 18 पैकी 12 आरोपींना 50 हजारांचा जामीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सतीश शेट्टी खून प्रकरणातील 18 पैकी 12 आरोपींना पुणे कोर्टाने 50 हजारांचा जामीन मंजूर केला आहे. आजच्या सुनावणीदरम्यान आयआरबीच्या विरेंद्र म्हैसकरांसह 12 आरोपी हजर असताना, त्यांच्या अटकेची गरज नसल्याचे सीबीआयने पुणे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे कोर्टाने 12 आरोपींना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

 

सीबीआयने याच आरोपींविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये 73 एकर जमीन हडपल्याचा आरोप आहे. आणि जमीन हडपण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रं बनवल्याचा आरोपही सीबीआयने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयला आरोपींच्या कस्टडीची गरज नाही का, असा सवालही उपस्थित होत आहे.

13 जानेवारी 2010 रोजी पुण्याजवळ तळेगाव-दाभाडेत आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचा खून झाला होती. सतीश शेट्टींचा भाऊ संदीप शेट्टीने विरेंद्र म्हैसकर यांच्यावर खून आरोप केला होता.

बातम्या आणखी आहेत...