आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satish Shetty Murder Case Another Police Officer Arrest By Cbi

सतीश शेट्टी हत्येप्रकरणी आणखी एका निवृत्त पोलिस निरीक्षकाला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतीश शेट्टी - Divya Marathi
सतीश शेट्टी
पुणे- आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्याप्रकरणी सीबीआयने आणखी एका निवृत्त पोलिस अधिका-याला अटक केली आहे. नामदेव कौठाळे असे या पोलिस अधिका-याचे नाव आहे. रविवारी रात्री उशिरा पुण्यातून कौठाळे यांना सीबीआयने अटक केली. आज दुपारी त्यांना पुण्यातील कोर्टात हजर करण्यात आले असता, कौठाळे यांना 16 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सतीश शेट्टी हत्याप्रकरणी निवृत्त व माजी पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर (बार्शी) यांना सीबीआयने मागील आठवड्यात अटक केली होती. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. त्यानंतर कौठाळेया पोलिस अधिका-याला अटक झाल्याने या प्रकरणात पोलिसांची महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट होत आहे. सतीश शेट्टी यांची 13 जानेवारी 2010 रोजी हत्या करण्यात आली होती. नामदेव कौठाळे हे त्यावेळी पुणे ग्रामीण पोलीस दलातील वडगाव मावळ या पोलिस ठाण्यात ग्रामीण पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.
सतीश शेट्टी यांच्या हत्येनंतर स्थानिक पोलिस तपास करीत होते. मात्र, पोलिसांनी योग्य तपास केला नाही. याप्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सहा जणांना अटक केली होती. तसेच ख-या मारेक-यांना पाठीशी घातल्याचा आरोप सतीश यांचा भाऊ संदीप शेट्टी यांनी केला होती. स्थानिक पोलिसांकडून तपास योग्य दिशेने होत नसल्याने तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी ही केस सीबीआयकडे सोपवली होती.