आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satish Shetty Murder Case Retired Police Officer Bhausaheb Andhalkar Arrest

सतीश शेट्टी हत्या प्रकरण: भाऊसाहेब अांधळकरची पाेलिस काेठडीत रवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्याप्रकरणी अटकेत असलेला माजी पाेलिस िनरीक्षक भाऊसाहेब अांधळकर (मूळ राहणार साैंदरे, ता.बार्शी) यास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीबीअाय) बुधवारी अटक केली अाहे. गुरुवारी त्याला पुणे सत्र न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी. कचरे यांच्यासमोर हजर केले असता १६ एप्रिलपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे अादेश देण्याचे अाले.

सीबीअायचे वरिष्ठ सरकारी वकील अतुल कुमार न्यायालयात म्हणाले, ‘सतीश शेट्टी हत्येमागे माेठा कट रचण्यात अाला अाहे. या हत्येतील महत्त्वपूर्ण धागेदाेरे अाणि हल्ल्यातील शस्त्र अद्याप जप्त न झाल्याने त्याबाबत चाैकशी करण्यासाठी अाराेपीला पाेलिस काेठडी गरजेची अाहे. ’
सीबीअायचे तपास अधिकारी विजय शुक्ला म्हणाले, ‘शेट्टी हत्या प्रकरणाचा सीबीअायने तपास करावा, असे आदेश राज्य सरकारने पाच वर्षांपूर्वी काढले हाेते. त्यानंतर पुणे ग्रामीण पाेलिसांनी १३ एप्रिल २०१० रोजी पाचजणांविराेधात न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या अादेशानुसार सीबीअायने याबाबत तपास केला आहे. ’

नार्काे चाचणीस अांधळकर तयार
भाऊसाहेब अांधळकर यांचे वकील सुधीर शहा यांनी प्रतिवाद करताना सांगितले, सतीश शेट्टी यांची हत्या झाली त्यावेळी अांधळकर पाेलिस सेवेत हाेते. त्यावेळी न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल झाले. त्यानंतर सीबीअायने मागील चार वर्षांत अनेकवेळा त्यांच्याकडे चाैकशी केली अाहे. अायअारबी इन्फ्रास्ट्रक्चर, साबळे-वाघिरे यांच्याकडे याप्रकरणाची चाैकशी करून सीबीअायने या प्रकरणाचा क्लाेजर रिपाेर्ट न्यायालयात सादर केला अाहे. अांधळकर यांना याप्रकरणात गाेवण्यात आले असून ते नार्काे चाचणीसही तयार असल्याचे सांगितले.