आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satish Shetty Murder Isuue Cbi Submit Imp. Information In Highcourt

सतीश शेट्टी हत्याप्रकरणी \'आयआरबी\' सीबीआयच्या रडारवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येला आता चार वर्षे उलटली आहेत. शेट्टी हत्याप्रकरणी अद्याप कोणावरही दोषारोप करण्यात आलेले नाहीत. स्थानिक पोलिस व सीबीआयने याप्रकरणी तपास केला असला तरी अद्याप त्यांच्या हाती काहीही लागले नाही. मात्र आता, सीबीआयने हायकोर्टात शेट्टी हत्याप्रकरणी आयआरबी कंपनीबाबत महत्त्वाची माहिती सादर केली आहे. त्यामुळे शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी पुन्हा एकदा सीबीआय सक्रीय झाली असून, या गुन्ह्याची पहिल्यापासून तपास करणार आहे.
स्थानिक पोलिसांनी शेट्टी यांच्या हत्येप्रकरणाचा तपास व्यवस्थित केला नसल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. शेट्टी यांनी आयआरबी कंपनीविरूदध पोलिसांत व कोर्टात तक्रारी केल्या होत्या. त्यामुळेच शेट्टी यांची हत्या झाल्याचा संशय सीबीआयला आहे. त्यासाठीची सर्व माहिती हायकोर्टात सादर केल्याने या हत्येप्रकरणी सीबीआयच्या रडारवर आता आयआरबी कंपनी आल्याचे सांगण्यात येत आहे.