पुणे - अवकाळी पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेला सवाई गंधर्व भीमसेन मोहोत्सवाचे पुन्हा आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 1 जानेवारी 2015 ते 4 जानेवारी 2015 या काळात न्यू इंग्लीश स्कुल रमणबाग येथे होणार असल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी जाहीर केले आहे. मोहोत्सवाचे वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येईल असे जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, डिसेंबर महिन्यात (11 ते 14 डिसेंबर) या काळात आयोजित करण्यात आलेल्या सवाई गंधर्व मोहस्तवाची तिकिटे ज्यांनी पहिले खरेदी केली आहेत तिच तिकिटे नव्याने आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी जुनी तिकिटे व्यवस्थित संभाळून ठेवावी असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.