आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुण्यात ७ ते ११ डिसेंबरदरम्यान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - देश-विदेशांतील संगीत रसिकांच्या औत्सुक्याचा विषय असलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव यंदा ७ ते ११ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे ६४ वे वर्ष आहे. यंदा प्रथमच हा संगीत महोत्सव चारऐवजी पाच दिवस होणार आहे. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागेच्या मैदानावर हा महोत्सव होईल.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले जाते. सुरुवातीला हा महोत्सव तीन रात्री अखंड होत असे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० नंतर सार्वजनिक ठिकाणी ध्वनीची मर्यादा लागू झाल्याने महोत्सव सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळात होऊ लागला. दरवर्षी गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारची दोन सत्रे, असा महोत्सव होत असे. यंदा रविवारचे सकाळचे सत्र रद्द करून त्याऐवजी एक दिवस सायंकाळचे सत्र वाढवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली. महोत्सवातील कलाकार व इतर तपशील नंतर जाहीर केला जाईल, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...