पुणे- पुण्यात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी मोठ्या थाटात झाले. मात्र, दुस-याच दिवशी अवकाळी पावसाचा फटका बसल्याने उर्वरित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे आयोजकांनी जाहीर केले. पुढील चार दिवस नियोजित कार्यक्रम होते. मात्र, शुक्रवारी सकाळपासून पुण्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ज्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तेथे चिखलाने जागा घेतली. त्यामुळे आयोजिकांनी रसिक व प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था नसल्याने हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
संक्रांतीनंतर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात हा महोत्सव घेण्याचा विचार आयोजकांनी मांडला आहे. त्यानुसार पुढील महिन्या-दीड महिन्याच्या कालावधीत हा महोत्सव होऊ शकतो असे आयोजकांनी कळविले आहे.