आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआयचे विशेष कार्ड बाजारात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - क्रेडीट कार्डचा वापर करतांना बी पी ओ कर्मचारी शिस्त पळत नसल्याने एसबीआय कार्डस ने फिक्स डिपोझिटवर आधारित विशेष कार्ड बाजारात आणले असून आतापर्यंत १२ हजार ग्राहकांनी ते घेतल्याची माहिती एस बी आय कार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबी नरहरी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
२०१४ पर्यंत कंपनी एक कोटी ग्राहक मिळविणार आहे असेही त्यांनी सांगितले. आडव्हानटेज प्लस हे बी पी ओ मधील लोकांसाठी कार्ड असून त्याची माहिती देताना नरहरी म्हणाले की, एखाद्या ग्राहकाने हे कार्ड घेतल्यावर तो जसजसे पैसे फेडेल त्याप्रमाणे त्याला दिल्या जाणा-या उचल रकमेची मर्यादा वाढविली जाते. त्यामुळे हा ग्राहक वेळेवर कार्ड वापरून उरलेल्या रकमेची परतफेड करतो. या प्रमाणे बचतीला चालना देणारे सिक्युअर्ड कार्ड आम्ही बाजारात आणले आहे. बँकेत मुदत ठेवीवर जसे व्याज मिळते त्याप्रमाणे यावर व्याज दिले जाते. पहिल्या वर्षात १८ टक्के दराने कार्ड धारकाला उचल मिळते आणि वर्षानंतर ती निशुल्क होते.
महाराष्ट्र बँकेच्या सहकार्यामुळे कंपनीने ९००० कार्ड विकली असून येत्या वर्षात २०-२५ हजार कार्ड विकली जातील अशी माहिती देऊन ते म्हणाले की, रिटेल आणि इंटर नेट यामुळे १.७ कोटीवरून (२००९ ) १.८ कोटी ( २०१२) झाली आहे. क्रेडीट ब्युरोकडे कर्ज थकविणा-या लोकांची माहिती गोळा होत असल्याने त्याचा फायदाही आम्हाला मिळत आहे. महाराष्ट्र बॅकेखेरीज ओरिएनटल बँक आणि करुर वैश्य बँकेशी आम्ही कार्ड विक्रीसाठी करार केला आहे.