आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतीकुमारी बलात्कार व खून खटल्यातील आरोपींना फाशीच, SC चेही शिक्कामोर्तब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील हिंजवडीत विप्रो कंपनीत कामाला असलेली ज्योतीकुमारी (22) या तरूणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून खून केल्याच्या प्रकरणातील आरोपींना झालेली फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवली आहे. त्यामुळे या खटल्यातील दोघा आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले आहे. पुरुषोत्तम बोराटे (30, रा. गहुंजे) आणि प्रदीप कोकाटे (30. रा. गहुंजे) अशी दोघांची नावे आहेत.
हिंजवडीत विप्रो कंपनीत नोकरीला असलेली ज्योतीकुमारी (22) मूळची गोरखपूर, यूपीतील होती. बहिण व तिचा पती यांच्यासोबत ती पाषाण भागात राहत होती. 1 नोव्हेंबर 2007 रोजी तिची रात्रपाळी असल्याने तिला नेण्यासाठी कंपनीची मोटार आली. बोराटे कारचालक होता तर त्याचा मित्र पेंटर कोकाटे त्याच गाडीत बसलेला होता. पाषाणवरून हिंजवडीला जाताना या दोघांनी कार पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून हिंजवडीकडे न नेता गहुंजेकडे निर्जनस्थळी घेऊन गेले. त्याठिकाणी या दोघांनी तिच्यावर पाशवी बलात्कार करून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी तिच्या मृतदेह छिन्नविच्छिन करून टाकला. चेहरा दगडाने ठेचून ओळखता येणार नाही असा करून टाकला व तेथून पसार झाले. 4 नोव्हेंबर 2007 रोजी तिचा मृतदेह मिळून आला.
पोलिसांनी या प्रकरणी बोराटे व कोकटेला अटक केली होती. पोलिसांनी सर्व पुरावे कोर्टात सादर केल्याने या दोघांना पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा 2012 मध्ये सुनावली होती. त्यानंतर या आरोपींनी हायकोर्टात धाव घेतली मात्र तेथेही सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली. त्यानंतरही आरोपी सुप्रीम कोर्टात गेले. मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. ही हत्या क्रूरपणे केली आहे. आरोपींना याचा कसलाही पश्चाताप झालेला नाही असे सांगत सुप्रीम कोर्टानेही या दोघांची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
बातम्या आणखी आहेत...