आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विलोकन याचिका फेटाळली, संजय दत्तचा रक्तदाब वाढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली / पुणे - येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तची पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटावेळी अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला संजय दत्त येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) त्याच्यावतीने दाखल करण्यात आलेली पुनर्विलोकन याचिका फेटाळल्यामुळे त्याच्या बाहेर येण्याचा आशा मावळल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपासून संजय दत्तला रक्तदाबाचा त्रास होत आहे. दोन दिवसांपूर्वी अचानक त्याची प्रकृती बिघडल्यामुळे पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधील तीन डॉक्टरांचे पथक बोलावण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शनिवार आणि रविवारी त्याच्या विविध तपासण्या केल्या होत्या. अतिधूम्रपान आणि उच्च रक्तदाबामुळे संजय दत्तला त्रास झाल्याचे ससूनच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, पेरीफेरल आर्टिरियलच्या (शरीराच्या विविध अवयवांना रक्तपुरवठा कमी पडणे) विकाराने तो ग्रासल्याने सिटी अँजिओग्राम तसेच आर्टिरियल टेस्ट करणे अपरिहार्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.