आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरावेचक मुलांसाठी देणार शिष्यवृत्तीचे पैसे, छाेट्या विद्यार्थ्यांनी लिहिले आयुक्तांना पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - गुणवत्तेला संवेदनशीलतेची जोड असल्यास काय घडू शकते याचा उत्तम वस्तुपाठ पुण्यातील मनपा शाळेत शिकणा-या लहानग्या विद्यार्थ्यांनी घालून दिला आहे. कचरा वेचणा-या मुलांच्या शिक्षणासाठी या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली शिष्यवृत्तीची रक्कम देऊ केली आहे. सुमारे ५०० मुलांनी आपली प्रत्येकी १५ ते २५ हजार रुपये देऊ केले आहे. मनपा आयुक्तांना तसे पत्रही त्यांनी दिले आहे. शाळेतील कचरावेचक मुलांना या पैशांतून दप्तर, पुस्तके, रेनकोट पुरवले जातील.

दहावी व बारावीत ८० टक्क्यांवर गुण घेणा-या मनपा शाळांतील मुलांना शासनातर्फे ‘मौलाना अब्दुल कलाम आझाद’ व ‘लोकशाहीर आण्णाभाऊ साठे योजने’तून अनुक्रमे १५ हजार व २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. जून २०१४ मध्ये निकाल लागल्यानंतर शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी एकत्र आले. ही शिष्यवृत्ती आपल्याला मिळाली, पण एवढ्या रकमेची आपल्याला खरेच गरज आहे का? आपले आई-बाबा शिक्षणाचा खर्च सहज उचलू शकतात. मग हा पैसा गरजूंच्या शिक्षणावर खर्च करू यावर त्यांचे एकमत झाले. लगेच तसे पत्र तयार करून त्यावर सर्वांनी स्वाक्ष-या केल्या. मुलांमधील या संवेदनशीलतेने मनपा अधिकारी, शिक्षकही गहिवरले.

मदतीसाठी आवाहन
कचरावेचक मुलांच्या शाळा गळतीचे प्रमाणही प्रचंड आहे. पालक त्यांच्या शिक्षणाचा खर्च करू शकत नाहीत. या मुलांच्या रकमेतून शालेय साहित्य दिले जाईल. तरी समाजातील दानशूरांनी याकामी मदत करावी, असे आवाहन शैलजा अरळकर यांनी केले. त्यासाठी ९७६५९९९४९६ या क्रमांकावर संपर्क करावा.