आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Becomes Business Its Not Good Nana Patekar

शाळांचा व्यवसाय झाल्याचे वाईट वाटते- अभिनेता नाना पाटेकरची खंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पालकांना आपल्या पाल्यासाठी शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी स्वत:ची पाकिटे तपासावी लागतात. शाळांचे रूपांतर व्यवसायात झाले असून पालकांची आर्थिक परिस्थिती पाहून प्रवेश दिले जातात या गोष्टीचे वाईट वाटते, अशी खंत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मंगळवारी व्यक्त केली. दरम्यान, पोलिस आयुक्त गुलाब पोळ यांनी या कार्यक्रमात नाना पाटेकर यांची पुणे पोलिसांचा ब्रॅँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केल्याची घोषणा केली.
पुणे शहर पोलिस व मुक्तांंगण मित्रतर्फे आयोजित ‘जागतिक अमली पदार्थविरोधी जनजागरण समारोप’ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट, पोलिस आयुक्त गुलाब पोळ, सहायक पोलिस आयुक्त संजीवकुमार सिंघल आदी उपस्थित होते. नाना म्हणाला की, आज माणसे संवेदनाहीन झाली आहेत. आजूबाजूला घडणाºया गोष्टींना आपण गांभीर्याने घेत नाही व काही विपरीत घडल्यास जबाबदाºया झटकण्याचे काम करतो. राजकारणाचे तथाकथित आदर्श एकमेकांकडे बोटे दाखवून आपण त्यातील नाहीच, अशा पद्धतीने वागत आहेत. जागेची मर्यादा असताना सरकार लोकसंख्या मर्यादित ठेवण्याचा विचार करत नाही. चित्रपटांच्या माध्यमातून काही सामाजिक उपदेश देण्याचा प्रयत्न केला तरी लोक ‘दबंग’ पाहणेच पसंत करतात. मुलांसाठी पालक अनंत कष्ट सोसत असतात. मुलांनी त्याची जाण आयुष्यात ठेवून जीवन घडवायचे असते. व्यसनात अडकणे सोपे आहे, पण त्यातून बाहेर पडणे अवघड आहे, त्यामुळे व्यसनाच्या आहारी जाऊ नका, असे आवाहनही नानाने केले.
एसीपी ढोबळेंसारखा अधिकारी पुण्यात हवा- नाना म्हणाला, पोलिस खात्यात चांगले काम करणाºया चांगल्या कर्मचाºयाच्या पाठीशी वरिष्ठ अधिकाºयांनी राहिले पाहिजे. झोपडपट्टीतील व्यसने उच्चभ्रू सोसायटीत गेली असून त्यावर कारवाई करणारा मुंबईतील सहायक पोलिस आयुक्त वसंत ढोबळे यांच्यासारखा अधिकारी पुण्यात हवा. मी साध्या वेशातील पोलिस असून जे अनुचित घडताना दिसते ते रोखण्याचा प्रयत्न करतो, असेही त्याने नमूद केले.