आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Bus Driver & His Attendent Harresment Of Nursury Girl

पुण्यात शालेय मुलीवर अत्याचार, संस्थाचालक नवलेंना पालकांकडून मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील स्प्रिंगडेल शाळेतील एका विद्यार्थिनीसोबत स्कूल बसचालक व त्यांच्या मदतनीसाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. या बसचालकासह त्याच्या सहका-यावर कारवाई करावी अशी मागणी संतप्त पालकांनी केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्याने येथील पालकांचा संयम सुटला आणि थेट संस्थाचालक मारूती नवले यांना मारहाण करण्यात आली. मारूती नवले हे सिंहगड एज्यकेशन संस्थेचे संचालक आहेत तसेच ही स्प्रिंगडेल शाळाही सिंहगड एज्यकेशन सोसायटीच्या अंतर्गत मोडते.
मागील 3-4 दिवसापूर्वी संबंधित मुलीवर अत्याचार झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. याबाबत मुलीच्या पालकांनी शाळेकडे तक्रार केल्यानंतरही व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले होते. याबाबत पालकांनी आज शाळेत येऊन संचालक मारूती नवलेंची भेट घेऊन कारवाई का केली नाही असा जाब विचारला. मात्र, नवलेंनी समाधानकारक उत्तर न दिल्याने पालकांच्या रागाचा उद्रेक झाला. संतप्त पालकांनी त्याचवेळी शाळेत तोडफोड सुरू केली व मारूती नवलेंनाही मारहाण केली. पालकांत बहुतांश महिला आल्या आहेत. शाळेत अद्यापही गोंधळ सुरु आहे. दरम्यान, पालकांनी शाळेची तोडफोड करताच पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
छायाचित्र: मारूती नवले