आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘स्कूल ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन’ पुण्यात सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एमआयटी शिक्षण संस्थेच्या वतीने पुण्याजवळच्या राजबाग (लोणी काळभोर) येथे ‘स्कूल ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन’ सुरू करण्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल नव्या संस्थेचे संचालक म्हणून काम पाहणार आहेत. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून येथील नव्या अभ्यासक्रमांना सुरुवात होणार आहे.
एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, संचालक डॉ. जब्बार पटेल आणि एमआयटीचे उपाध्यक्ष राहुल कराड यांनी ही माहिती दिली. चित्रपट निर्मिती क्षेत्रात विविध कलागुणांना वाव आहे. विविध प्रकारचे कौशल्य प्राप्त करणा-या युवकांना या संस्थेच्या माध्यमातून करिअरची नवी क्षितिजे खुणावतील, असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.

असे असतील अभ्यासक्रम
>दिग्दर्शन, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण आणि संकलन या विषयांचे तीन वर्षांचे पूर्णवेळ अभ्यासक्रम
>पटकथालेखन आणि कला दिग्दर्शन या विषयांचे दोन वर्षांचे पूर्णवेळ अभ्यासक्रम
>दूरचित्रवाणी निर्मितीचा एक वर्षाचा अभ्यासक्रम
>प्रत्येक अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २० विद्यार्थी
>कोणत्याही शाखेचा पदवीधर ही पात्रता
>सहकार्य : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ), शंकर महादेवन म्युझिक अकादमी (संगीत)
> तंत्रज्ञान सहकार्य : डॉन स्टुडिओ पुणे
> खुद्द राजबागेत नव्या सुसज्ज स्टुडिओची उभारणी