आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळेत तिसऱ्या मजल्यावरुन पडून विद्यार्थ्याचा मृत्यू, बॅडमिंटनचे फूल काढण्याच्या प्रयत्नांत गला तोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शाळेत बॅडमिंटन खेळत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने एका शाळकरी मुलाचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम तुकाराम खंडागळे (वय ११, रा, शिवदर्शन) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. पुण्यातील सहकारनगर परिसरात महापालिकेची राजीव गांधी ई लर्निंग स्कूल आहे. या शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर शुभम खेळत असताना बॅडमिंटनचे फूल पडले म्हणून कडेची छोटी खिडकी उघडून ते काढण्याच्या प्रयत्नांत तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. शाळेच्या आतच सभागृह आहे. त्या सभागृहाला पक्के छत नाही. केवळ पातळ आच्छादन घालण्यात आले आहे. याची कल्पना विद्यार्थ्यांना नव्हती. आच्छादनाभोवतीच्या ग्रीलला साधी कडी होती. ती उघडून शुभमने सरळ छत समजून त्या आच्छादनावर उडी मारली आणि तो खाली कोसळला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...