आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांची हमी घेऊनच शैक्षणिक सहली काढा, शिक्षण विभागाकडून नियमावलीत बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शाळा तसेच महाविद्यालयांनी सहली काढताना प्रशिक्षित, अनुभवी शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन घ्यावे, सहल समितीची स्थापना करावी, संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांकडून हमीपत्र घ्यावे, सहलीच्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी आदी शिफारशींसह शैक्षणिक सहलींचे सुधारित परिपत्रक शिक्षण उपसंचालकांनी गुरुवारी जारी केले.

पुण्यातील आबेदा इनामदार महाविद्यालयातील १२५ विद्यार्थी मुरूड येथील समुद्रकिनाऱ्यावर सहलीसाठी गेले हाेते. त्यापैकी १४ मुले पाण्यात बुडाले हाेते. महाविद्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळेच या मुलांचा मृत्यू झाल्याचा अाराेप त्यावेळी पालकांनी केला हाेता.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर शिक्षण उपसंचालकांनी त्वरित एक पत्रक काढून शैक्षणिक संस्थांना सहलीविषयीची नवी नियमावली पाठवली होती. यात समुद्र, डाेंगर- दऱ्या, गड-किल्ले, जंगले अशा धाेक्याच्या ठिकाणी सहली न काढण्याचे फर्मान काढण्यात अाले हाेते. मात्र, त्यावर सर्व स्तरांतून माेठ्या प्रमाणावर टीका झाली. त्यानंतर शिक्षण विभागाला चुकीची जाणीव झाली. गुरुवारी याबाबत पुन्हा बैठक घेऊन नवी नियमावली जारी करण्यात आली. उपरोक्त सूचना या सुधारित परिपत्रकात करण्यात आल्या आहेत. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी ही नियमावली जारी केली आहे.

सहलीच्या स्थळाची अाधी करावी पाहणी
सहलीच्या ठिकाणाची दोन जबाबदार व्यक्तींनी अाधी पाहणी करावी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली जावी, शाळा व्यवस्थापनाची परवानगी घ्यावी, पालकांकडून हमीपत्र घ्यावे, या सूचना करण्यात अाल्या अाहेत.