आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतही विज्ञान केंद्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानातची आवड निर्माण करून त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात मुंबई, नागपूर, सोलापूर व पिंपरी-चिंचवड येथे विज्ञान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. आगामी काळात औरंगाबाद, अमरावती व नाशिक येथे त्यांची उभारणी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

केंद्र शासनाचे सांस्कृतिक मंत्रालय व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे उभारण्यात आलेल्या ‘पिंपरी चिंचवड सायन्स सेंटर’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय सांस्कृतिकमंत्री चंद्रेशकुमारी कटोच, उपमुख्यमंत्री अजित यांची प्रमुख उपस्थित होती. मुख्यमंत्री म्हणाले, जगातील पहिल्या 200 विद्यापीठांत देशातील एकाही विद्यापीठाचा समावेश होत नाही ही बाब चिंताजनक आहे. संशोधन व गुणवत्तेत आपण जगात मागे असून भविष्यात ऊर्जा व पाणी क्षेत्रातील संशोधनावर भर द्यावा लागेल. उपमुख्यमंत्री पवार यांचेही भाषण झाले.