आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओझे हलके करणारी सायंटिफिक स्कूलबॅग, खांदे, कंबर, पाठीवर भार समान विभागला जातो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दप्तराच्या ओझ्याखाली मुलांचे बालपण दडपले असतानाच वजनाने जड बॅगपासून त्यांना मुक्ती देण्यासाठी सोलापूरच्या आनंद झाड यांनी शास्त्रशुद्ध स्कूलबॅगची निर्मिती केली आहे. ओझे सुमारे २० टक्क्यांनी कमी जाणवून देणाऱ्या या बॅगमुळे पाठदुखी, मानदुखी आणि थकव्यापासून मुलांची सुटका होते.
देशातील अशा प्रकारची ही पहिलीच सायंटिफिक बॅग असल्याचा आनंद यांचा दावा आहे. देशविदेशातील बँगांची आनंद यांनी माहिती घेतली. चीनचा दौरा करून स्कूलबॅग इंडस्ट्रीचा अभ्यासही केला. दक्षिण आफ्रिकेत वैज्ञानिक तंत्राने स्कूल बॅग तयार होत असल्याचे कळाल्यावर तेथून त्यांनी काही बॅग्जचे नमुने मागवले. दीड वर्षे अभ्यास आणि परिश्रम केल्यावर बॅगेतील सामानाचा भार पाठीवर, खांद्यावर, कंबरेवर विभागून वजनास हलकी वाटणारी अशी उच्च दर्जाचे साहित्य वापरून शास्त्रीयदृष्ट्या डिझाइन केलेली बॅग आकाराला आली.

अाजी-अाजाेबांकडून प्रेरणा
सोलापुरातील मेसर्स प्रभाकर डोंगरसा झाड फर्मचे आनंद सांगतात की, आम्ही मूळ पुण्याचे. परिस्थिती खालावल्याने आजोबा डोंगरसा विठ्ठल झाड हे १९६०च्या दशकात आजी शांताबाई यांच्या माहेरी सोलातुरात कामधंदा शोधण्यासाठी आले. तेव्हा आजी सेलापुरी चादरीच्या तुकड्यांपासून पिशव्या तयार करायची. माझे वडील प्रभाकर व काका प्रकाश त्या बाजारात विकायचे.
पंढरपूर, तुळजापुरात पिशव्यांचा खप वाढला. पुढे १९६४मध्ये फर्म स्थापन केली. त्यामुळे मी व भावाने लहानपणापासून हा व्यवसाय जवळून बघितला आहे. नाविन्यपूर्ण काही करावे म्हणून सायंटिफिक बॅग काढली.
बॅगची वैशिष्ट्ये अशी
{वजन 850 ते 900 ग्रॅम आहे. तळ सपाट व उभी राहू शकेल असे डिझाइन आहे.
{माकडहाड ते मणका भागात पाठीवर बसते. अॅल्युमिनियम पट्टीमुळे आरामदायी वाटते.
{मणका, कंबर, खांदा यांना त्रास होऊ नये म्हणून पाठीकडील रचना, बंद आरामदायी केले.
{पाठीला घाम आल्यास तो शोषून घेण्यासाठी बंदांना उच्च प्रतीचे कुशन वापरलेले आहे.
{सुमारे अाठ िकलाेपर्यंत वजन पेलण्याची क्षमता, दोन वर्षांची वाॅरंटी आहे.
{किंमत २ हजार रुपये असून अॅमेझाॅन, फ्लिपकार्ट अशा ई-काॅमर्स साइटवर उपलब्ध.
मोबाइल चार्ज करणारी साेलार बॅग
बहुउद्देशीय बॅग करण्याच्या हेतूने सौरऊर्जेचा वापर केला. पुढील बाजूस फ्लेक्झिबल सोलार पॅनल बसवले. मागील कप्प्यात सोलारवर चार्ज होणारी १५०० एमएच बॅटरीची पाॅवर बॅक बसवली. अाठ तास उन्हात ठेवल्यानंतर ही बॅटरी सहा तास बॅकअप पाॅवर िनर्मिती व साठवणूक करते. बॅटरीवर मोबाइल, छोटी उपकरणे चार्ज करू शकते. बॅगेत १२ एलईडी बल्ब असलेला टेबल लॅम्पही दिला आहे. चार्ज झाल्यावर तो ६ तास चालतो. स्वतंत्र रेनकव्हरही बॅटरीला आहे. सौरऊर्जेवर लॅपटाॅप चार्ज करता यावा अशी बॅग आनंद बनवणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...