आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक बहीष्कार प्रतिबंध कायद्यांतर्गत दुसरा FIR; वैदू समाजाच्या 25 पंचावर गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येथील कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये सामाजिक बहिष्कार प्रतिबंध या नवीन कायद्यांतर्गत सोमवारी पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्याच कायद्यानुसार, दुसरा गुन्हा मंगळवारी पिंपरीतील सांगवी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. वैदू जात पंचायतीने बहिष्कृत केलेल्या प्रकरणात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी वैदू समाजाच्या 25 पंचावर आरोप लावण्यात आले आहेत. 
 
 
वैदू समाजाचे रामभाऊ लोखंडे आणि त्यांच्यासह सहा भावांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले होते. 2014 त्यांना बहिष्कृत करण्यात आले होते. त्यावेळी 50 हजार रुपये रक्कम घेऊन लोखंडे यांना समाजात परत घेतले होते. मात्र 16 जुलैला वैदू समाजाची पंचायत बसली. या पंचायतीला विरोध केला असता रामभाऊ लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबांना पुन्हा बहिष्कृत करण्यात आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सांगवी पोलिसात या संबंधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी  समाजातील अशा जातपंचायती चालवणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
 
 
विशेष म्हणजे रामभाऊ लोखंडे याना देवकार्यासाठी समाजात यायचे असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील तरच आम्ही तुम्हाला समाजात परत घेऊ अश्या प्रकारची धमकी पंचायतीतील पंचांनी दिली आहे. अशी माहिती रामभाऊ लोखंडे यांनी दिली. तसेच मुलांचे लग्न देखील होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणामुळे लोखंडे परिवार अडचणीत आला आहे. त्यामुळे अंनिसच्या मदतीने त्यांनी थेट सांगवी पोलीस स्थानक गाठले आणि गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...